February 12, 2025

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्जुन वेलुरी, कृष्णा राणी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

औंरंगाबाद, दि 29 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्जुन वेलुरी, कृष्णा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अर्जुन वेलुरीने मलय केयुरभाई मिंज रोलाचा 7-5, 3-6, 10-8 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली. कृष्णा राणी याने अहान डे याचा 6-3, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
अर्जुन वेलुरी (भारत) वि.वि.मलय केयुरभाई मिंज रोला (भारत)7-5, 3-6, 10-8;
कृष्णा राणी(भारत) वि.वि.अहान डे (भारत)6-3, 6-4;
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: मुले:
1.हृतिक कटकम, 2.आयुष पुजारी, 3.निवेद कोनिरेरा, 4.सार्थक गायकवाड, 5.प्रज्वल पटोलिया, 6.वरद पोळ, 7.मनन अग्रवाल, 8.आर्यमन चौहान;
मुली:
 1. पार्थसारथी मुंढे, 2.वेनेला रेड्डी गरुगुपती, 3.वृंदिका राजपूत, 4.वारी पाटणकर, 5.विभा खडका, 6.दक्षणाश्री एसआर, 7.मधुमिता रमेश, 8.प्रुथा राव.