कोविड मदतीसंदर्भात अद्ययावत माहिती

नवी दिल्‍ली, 23 मे 2021: भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19  मदत वैद्यकीय सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध देशांकडून / संस्थांकडून प्राप्त होत आहे. कोविड-19 व्यवस्थापनासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पूरक म्हणून ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहेत.

27 एप्रिल 2021 पासून 22 मे पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण 16,630 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स, 15,961 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 11,516 व्हेंटीलेटर्स/ बायपॅप, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या 6.9 लाख कुप्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत.

21/22 मे 2021 रोजी स्कॉटलंड (युके), गिलियड, यूएसआयएसपीएफ, केओआयसीए (दक्षिण कोरिया), बौद्ध संघ (व्हिएतनाम) यांच्याकडून मोठ्या वस्तू प्राप्त झाल्या.

Consignments Quantity
Oxygen Concentrators 100
Ventilators/Bi-PAP/CPAP 100
Remdesivir 29,296

*याव्यतिरिक्त, निगेटीव्ह प्रेशर कॅरियर्स आणि व्हायरल ट्यूब मीडिया उपकरणे प्राप्त झाली.

राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि  संस्थांना प्रभावी त्वरित वाटप आणि सुव्यवस्थित वितरण अविरत  सुरूच आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर व्यापक देखरेख ठेवून आहे.आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात प्राप्त परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष  26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली आणि अंमलात आणली.