नीति आयोग 3 जून 2021 रोजी ‘एसडीजी इंडिया इंडेक्‍स’ आणि ‘डॅशबोर्ड 2020-21’ प्रकाशित करणार

नवी दिल्‍ली, दि. २ जून २०२१: नीति आयोग 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणार आहे.  डिसेंबर 2018 मध्ये प्रथम सुरु करण्यात आलेला हा निर्देशांक देशातील शाश्वत विकास उद्दिष्ट संबंधी प्रगतीवर नजर ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर जागतिक उद्दिष्टांवर मानांकने देऊन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे.  नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड, 2020-21’ प्रकाशित करतील. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद पॉल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि नीती आयोगाच्या सल्लागार (एसडीजी) संयुक्ता समद्दार यावेळी उपस्थित असतील. नीती आयोगाने  विकसित केलेल्या या निर्देशांकासाठी तयारी करताना प्रमुख हितधारक-राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, भारतातील संयुक्त राष्ट्र संस्था, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि मुख्य केंद्रीय मंत्रालये  यांच्याबरोबर विस्तृत सल्लामसलत करण्यात आली.

एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड, 2020-21 : क्रियाशील दशकातील भागीदारी

भारतातील संयुक्त राष्ट्र संस्थांच्या सहकार्याने विकसित केलेला निर्देशांक, जागतिक उद्दिष्टे व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासातील राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पातळीवरील प्रगतीचे मोजमाप करतो आणि शाश्वत,  लवचिकता आणि भागीदारीचा संदेश प्रसारित करण्याचे  साधन म्हणून यशस्वी ठरला आहे, 2030 चा अजेंडा साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश प्रवास आपण पूर्ण केला असून निर्देशांकाच्या अहवालाची ही आवृत्ती भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करते आणि त्याला “एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड,2020-21 :” क्रियाशील दशकातील भागीदारी” असे शीर्षक आहे.

प्रत्येक आवृतीसह हे महत्त्वपूर्ण साधन आणखी सुयोग्य आणि सुधारित करण्यासाठी सातत्याने कामगिरी आणि  प्रगतीचे मोजमाप आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या  अद्ययावत एसडीजी संबंधित डेटाची उपलब्धता आवश्यक आहे. 2018-19 मधील पहिल्या आवृत्तीत 13 उद्दिष्टे, 39 लक्ष्ये आणि 62 निर्देशांक, दुसऱ्या आवृत्तीत  17 उद्दिष्टे,  54 लक्ष्ये आणि 100  निर्देशांक, तिसर्‍या आवृत्तीत 17 उद्दिष्टे, 70 लक्ष्ये आणि 115 निर्देशांकाचा समावेश आहे.

कार्यपद्धती आणि प्रक्रिया

निर्देशांक आणि त्यानंतरची कार्यपद्धती एसडीजीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मोजमाप आणि त्यांची क्रमवारी ठरवणे, अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असलेली  क्षेत्रे ओळखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना मदत करणे आणि त्यांच्यात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्याची उद्दिष्टे सुनिश्चित करते. निर्देशांक अंदाज पहिल्या 16 उद्दिष्टांसाठी निर्देशकांच्या आकडेवारीवर आधारित आहे तर उद्दिष्ट 17 साठी गुणात्मक मूल्यांकन केले आहे.

निर्देशकांची निवड करण्यापूर्वी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, केंद्रीय मंत्रालये आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील हितधारक यांच्याशी  समन्वयाने सल्लामसलत करून केली आहे.

राष्ट्रीय प्राधान्यक्रमानुसार, 2030 च्या अजेंडा अंतर्गत जागतिक उद्दिष्टांचे व्यापक स्वरुप सूचकांक दर्शवतो.

राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर एसडीजींचा अवलंब आणि देखरेखीमध्ये  समन्वय साधण्याचा नीती आयोगाला अधिकार आहे.