पीएमडीटीए-केपीआयटी- सोलिंको रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022 स्पर्धेत 80 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 14 ऑक्टोबर 2022: रोहिल शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे  पीएमडीटीए-केपीआयटी- सोलिंको रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 व 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे. 
 
स्पर्धेत एकूण 80 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा रोहिल शिंदे टेनिस अकादमी, कर्वे नगर या ठिकाणी होणार आहे.  स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.