पुणे, २८ मे २०२१: कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाला साथ देत पुणेकरांनी देशात सर्वाधिक मिळकत कर जमा केला. त्यामुळे कोरोनाच्या काळातही पालिकेचा आर्थिक गाडा रुळावर राहिला. पुणेकरांची हीच साथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कायम असून १ एप्रिल ते २८ मे या ५८ दिवसांमध्ये ४ लाख ४३ हजार ३९९ पुणेकरांनी ५८५ कोटी १४ लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर जमा होण्यात दुपटीने वाढ झाल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
१ एप्रिल ते ३१ मे कालावधीत ज्या मिळकतधारकांची कराची रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना १० टक्के सवलत दिली जाते. तर २५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के सवलत देण्यात येत आहे.
मागील वर्षी कोरोना काळात ०१ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण मिळकतकर भरलेल्या निवासी मिळकतधारकांना३१ मे २०२१ पूर्वी संपूर्ण मिळकतकर जमा केल्यास सर्व करांवर (शासनाचे कर वगळून) १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात २८ मेपर्यंत तब्बल ३ लाख ३६ हजार २९४ मिळकत धारकांना १५ टक्के सवलत मिळाली आहे. या मिळकतधारकांनी २५३ कोटी ३४ लाख रुपयांचा कर जमा केला असून त्यांना ४२ कोटी ०५ लाख रुपये सवलत मिळाली आहे.
याव्यतिरिक्त सवलत मिळण्याकरिता ३१ मेपूर्वी मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असल्याचे कानडे यांनी सांगितले. यंदाही नागरिकांनी डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन भरणा केला आहे.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात