पुणे, दि. २७ मे २०२१: अभ्यास केला नाही, म्हणून रागाच्या भरात अल्पवयीन मुलीला लाटण्याने मारहाण करणाऱ्या वडिलांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केले आहे. त्यांनी मुलीला लाटण्याने, पोळपटाने आणि हाताने मारहाण केल्याचा प्रकार ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडला. शेजारच्यांना मुलीला होत असलेली मारहाण बघवत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी ताडीवाला रस्ता परिसरात शेजारी-शेजारी राहतात. आरोपीला अल्पवयीन शाळकरी मुलगी आहे. तिने अभ्यास न केल्याने आरोपीने मुलीला लाटण्याने, पोळपटाने आणि हाताने अमानुष मारहाण केली. मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष न दिल्याने पत्नीला देखील शिवीगाळ केली. आरडा ओरडा आणि मुलीच्या रडण्याच्या आवाजामुळे फिर्यादी यांना याप्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मुलीला अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम