पुणे, २९/०७/२०२२: भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली.
अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.
वृषाली तुषार थिटे (वय ३८, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपरचालक घटनास्थळी डंपर सोडून पसार झाला
थिटे नऱ्हे परिसरातील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास त्या दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होत्या. वडगाव बुद्रुक परिसरातील शिंदे मैदानाजवळील रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रा. थिटे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न