पोलीस बदल्यामध्ये पारदर्शकता महत्वाची – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, २८ मे २०२१: पोलिस दलातील कर्मचाNयांच्या बदल्यासंदर्भात पारदर्शकता महत्वाची आहे. पुणे पोलिसांनी अंतर्गत बदल्यासाठी जनरल ट्रान्सफर पोलिस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) प्रणाली विकसीत केली आहे. त्याचा फायदा पोलिस दलाला होणार असून इतर ठिकाणीही असा उपक्रम सुरु आहे. त्यामुळे बदल्यांमधील वशिलेबाजी नियंत्रणात येण्यास मदत होईल. असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

गृहमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात भेट घेउन आढवा कामकाजाचा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, मीतेश घट्टे उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिकाNयांसोबत बोलणे होत होते. मात्र, प्रत्यक्षात आयुक्तालयात भेट देता आली नव्हती. त्यामुळे आज आयुक्तालयात भेट घेउन पुणे शहरातील कायदा आणि सुव्यस्थेचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये भरोसा सेल, जेष्ठ नागरिक कक्ष, बालकक्षासंदर्भात माहिती घेतल्यानंतर पुणे पोलिसांचे कामकाज चांगले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक समाधानी आहेत.

दरम्यान, जालना येथील तरूणाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीची घटना ९ एप्रिल रोजीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये गोंधळ घातला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, मात्र, तरूणाला मारहाण जास्तच झाली आहे. त्यासंदर्भात जालना पोलिस अधिक्षक कारवाईस सक्षम असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

 चंद्रकांत पाटलांच्या ‘विधानावर टीका

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टिका केली. ‘ सध्या कोरोनामुळे पोलिस व आरोग्य विभागावर भरपूर ताण आहे.त्यामुळे कोणीही चितावणीखोर वक्तव्य करु नये’ लोकांच्या मनामध्ये राग निर्माण करू नका असा टोला त्यांनी लगावला.