पुणे, २०/०८/२०२१: झटपट श्रीमंत होण्यासाठी शहरासह जिल्ह्यात १० ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत भावडांच्या मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनीट दोनला यश आले आहे. त्याशिवाय चोरीचे सोने विकत घेणाNया सोनारालाही अटक करण्यात आले आहे. आरोपींकडून ९ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. युवराज अर्जुन डोणे (वय २६) आणि अविनाश अर्जुन डोणे (वय २१ रा. मिरजगाव कवडेवस्ती ता.कर्जत नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नीलेश वुंâदनमल झाडमुथ्था (वय ३८ रा. आष्टी बीड) असे अटक केलेल्या सोनाराचे नाव आहे.
शहरामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सराईत घरफोडी करणारे डोणे भावंडे कात्रज तलाव परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अमलदार गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार आणि अलंकार, लोणीवंâद, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे मिळून ७ घरफोडी केल्याची कबुली दिली. भावंडांनी चोरलेले सोने नीलेश झाडमुथ्था या सराफाला विकले होते. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, गजानन सोनुने, कादीर शेख, किशोर वग्गु, संजय जाधव, उत्तम तारू, चंद्रकांत महाजन, निखिल जाधव, कादिर शेख, मितेश चोरमोले, समीर पटेल,गोपाल मदने, नामदेव रेणुसे, चेतन गोरे यांनी केली.
रेकीसाठी हडरपसरमध्ये भाडोत्री खोली
घरफोडीची रेकी करण्यासाठी सराईत भावडांनी हडपसरमध्ये भाडोत्री खोली घेतली होती. दिवसभर दुचाकीवर फिरून बंद घराचे कुलूप उचकटून ते चोरी करीत होते. त्यानंतर ते आष्टीतील सराफ झाडमुथ्था यांना विविध कारणे सांगून सोन्याची विक्री करीत होते. त्याशिवाय चोरीदरम्यान दुचाकी ओळखू येउ नये, यासाठी ते नंबरप्लेटवर चिखल लावत होते. मात्र, गुन्हे शाखेतील पोलीस अमलदार गजानन सोनुने यांच्या खबरायांमुळे सराईत भावडांचा भांडाफोड करण्यात आला.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम