पीएमडीटीए-केपीआयटी-सोलींको कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत 100 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 18 नोव्हेंबर 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी, पीडब्लूसी व सोलींको  यांच्या संलग्नतेने 8, 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2022  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 19 ते 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. 
 
स्पर्धेत एकूण 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8,10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळ टेनिस अकादमी या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.