पुणे, १६ फेब्रुवारी २०२४: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित १३व्या स्वर्गीय प्रो. वामनराव आलुरकर मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ११० मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभात रोड, पुणे येथे रविवार, १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले कि, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्बिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण २८ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेला स्वर्गीय श्रीमती सुमती शिरगावकर यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्वीस लीग फॉरमॅट प्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ७फेऱ्या होणार आहेत. हि स्पर्धा दोन गटात होणार असून गट अ: रेटेड १२५० व त्यावरील खेळाडू, गट ब: १००० ते १२४९ रेटेड खेळाडू या गटात पार पडणार आहे. स्पर्धेत अ गटात अव्वल मानांकित एफएम कशिश जैन(२१२१), गौरव बाकलिवाल(२१०६), गौरव झगडे(१९५८), तर ब गटात क्षितिज प्रसाद(१२४०) मार्मिक शहा(१२३९), सुमित पेठे(१२३३) हे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेसाठी आयए विनिता श्रोत्री हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती पुरस्कार विजेत्या डब्ल्यूआयएम मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर आणि सुनील मोकल यांच्या हस्ते पार पडणार आहे.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय