पुणे, 18 जानेवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 100 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर 19 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
पीवायसी हिंदु जिमखानाच्या बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 16 संघ असून पुरूष गटात 10संघ, महिला गटात 3 संघ आणि किड्स गटात 2 संघांचा समावेश आहे..
स्पर्धेतील सहभागी संघामध्ये प्रत्येक संघात 6 खेळाडूंचा समावेश असून हे सर्व खेळाडू क्लबचे सदस्य आहेत. स्पर्धेत पुरुष गटात कारा इंटेलेक्ट वॉरियर्स, अभिज लेकर्स, राठीज माव्हरिक्स, कॅप्स रॉकेट्स, स्पेक्ट्रम किंग्स, बुल्स, वाडेश्वर विझार्ड्स, पीवायसी हॉक्स, एटीएक्स ब्लेझर्स, पॉश राप्टर, तर महिला गटात एसेस, स्पार्क्स, मर्क्युरी यांचा आणि किड्स गटात हीट, सेलटिक्स, निक्स यांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असुन यामध्ये बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, सुवर्णा लिमये, कर्णा मेहता, शिरीन लिमये यांचा समावेश आहे.

More Stories
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत दिविज शरण, प्रतीक शेरॉन, अपूर्व जैसवाल, प्रार्थना ठोंबरे, सोहिनी मोहंती यांची विजयी सुरुवात
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी