पुण्यात बेशिस्तांवर पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा उतारा, वर्षभरात १७ कोटी ८५ लाखांची वसुली

पुणे, दि. ११/०५/२०२१: शहरात विनामास्क फिरणाNया बेशिस्तांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी पोलिसांनी बडगा कायम ठेवला आहे. त्यानुसार विविध चौकासह सिग्नल आणि नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ३ लाख ५४ हजार ९६९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे. त्यानुसार १७  कोटी ८५ लाखांची वसुली केली आहे. पोलिसांकडून वारंवार आवाहन करुनही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे  प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

शहरात दररोज सरासरी दोन ते तीन हजारांवर विमानास्क नागरिकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार  पोलिसांना मागील वर्षभरात तब्बल ३ लाख ५४ हजारांवर   बेशिस्त नागरिकांकडून १७ कोटी ८५ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अनेकांकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, विनामास्क प्रवास, सॅनिटायझरचा वापर न करीत सर्रासपणे आरोग्य विभागाच्या सूचनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाNयांकडून  प्रत्येकी ५०० रुपये दंडाच्या कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. दरम्यान, विनामास्क कारवाई करताना पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी होत असल्याचे दिसून आले आहे.
नागरिकांकडून दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांमध्ये  वादावादी होत आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी दिखाउपणे मास्कचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. मास्कचा वापर तोंडाला न करता गळ्यात घातल्यामुळे अनेकांविरूद्ध कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ मास्कचा वापर केला पाहिजे. दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी चेहNयावर मास्क न दिसल्यास कारवाई करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे.

स्वसंरक्षणासह सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापरणे आवश्यक आहे. मात्र, प्रवासादरम्यान काहीजणांकडून मास्क परिधान केले जात नसल्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे  त्यांच्याविरूद्ध दररोज दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. – अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा