पुणे: शहरात सोमवारी होणार १८४ ठिकाणी लसीकरण

पुणे, १३ जून २०२१: सरकारकडून कोव्हीशील्ड व कोव्हॅक्सीन लसीचे डोस उपलब्ध झाल्याने महापालिकेने उद्या (सोमवारी) १८४ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात लसीकरण केंद्र सुरू ठेवले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.


महापालिकेला कोव्हीशील्डचे ११ हजार तर कोव्हॅक्सीनचे २ हजार ३०० डोस उपलब्ध झाले आहेत. महापालिकेकडे काही डोस शिल्लक आहेत. त्याद्वारे सोमवारसाठी महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.

कोव्हॅक्सीन
-१६ मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या १८ वयाच्या पुढील सर्वांना दुसरा डोस मिळेल.

  • ४० टक्के लस थेट केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी राखीव.
  • ६० टक्के लस ऑनलाइन बुकिंगसाठी राखीव.
  • ऑनलाइन बुकिंग सोमवारी सकाळी ८ ला सुरु होईल.

कोव्हीशील्ड

  • २२मार्च रोजी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणार
  • ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी ६० लस ऑनलाइन बुकिंगसाठी राखीव असतील.
  • उर्वरित ४० टक्के लस दुसरा डोस आणि फ्रंटलाइन कर्मचारी, दिव्यांग, स्तनदा माता, थेट केंद्रावर आलेले नागरिक यांच्या पहिल्या डोससाठी असेल.