September 24, 2025

18व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या पुनीत एम याला दुहेरी मुकुट

मुंबई, 17 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 18व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या पुनीत एम याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलींच्या गटात हरियाणाच्या सरेना गहलोट हीने विजेतेपद पटकावले.
जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व बॉबे जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित कर्नाटकच्या पुनीत एम याने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित आरव छल्लानीचा 6-3, 5-7, 7-6(4) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधी काल दुहेरीत पुनीत एम याने उत्तर प्रदेशच्या युवान गर्गच्या साथीत विजेतेपद पटकावले होते.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या सरेना गहलोटने आपली राज्य सहकारी  हरियाणाच्या खुशी कादियनचा 7-6(4), 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या व उपविजेत्या जोडीला करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर हिमांशु मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: 12वर्षांखालील मुले:
पुनीत एम(कर्नाटक)[3]वि.वि.आरव छल्लानी(महाराष्ट्र)[4]6-3, 5-7, 7-6(4);
12वर्षांखालील मुली:
सरेना गहलोट(हरियाणा)[3]वि.वि.खुशी कादियन(हरियाणा) [2]7-6(4), 6-1.