पुणे, दि. १५ जानेवारी २०२४: प्रामुख्याने निमशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख ५४ हजार २९४ वीजग्राहकांनी २१७ कोटी ४६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आतापर्यंत ४५३ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले असून गेल्या वर्षात या वॉलेटधारकांना कमिशन म्हणून तब्बल १ कोटी २७ लाख ७१ हजार ४७० रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावा यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय / उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभागात गेल्या वर्षात पुणे जिल्ह्यामध्ये १ लाख ३२ हजार ७४१ ग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १२ कोटी ३९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात संबंधित ७२ वॉलेटधारकांना कमिशन म्हणून ६ लाख ६३ हजार ७०५ रुपयांचे कमिशन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात १० लाख ९५ हजार २२९ ग्राहकांनी वॉलेटद्वारे ९२ कोटी ८४ लाख रुपये वीजबिल भरले. यात संबंधित १८२ वॉलेटधारकांना ५४ लाख ७६ हजार १४५ रुपयांचे कमिशन देण्यात आले.
सांगली जिल्ह्यात १ लाख १ हजार ५८३ ग्राहकांनी वॉलेटद्वारे ८ कोटी ९३ लाख रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ३३ वॉलेटधारकांना ५ लाख ७ हजार ९१५ रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ९४६ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १८ कोटी ४५ लाखांचा भरणा केला. यात संबंधित ७० वॉलेटधारकांना ८ लाख ८९ हजार ७३० रुपयांचे कमिशन देण्यात आले. तर सातारा जिल्ह्यात १० लाख ४६ हजार ७९५ ग्राहकांनी ८४ कोटी ८५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला. यात संबंधित ९६ वॉलेटधारकांना ५२ लाख ३३ हजार ९७५ रुपयांचे कमिशन देण्यात आले.
आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.
महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ वॉलेटला पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद | |||||
जिल्हा | वॉलेट बिल भरणा | ग्राहकसंख्या | वॉलेटधारक | वॉलेट कमिशन | |
पुणे | १२.३९ कोटी | १३२७४१ | ७२ | ६६३७०५ | |
कोल्हापूर | ९२.८४ कोटी | १०९५२२२९ | १८२ | ५४७६१४५ | |
सांगली | ८.९३ कोटी | १०१५८३ | ३३ | ५०७९१५ | |
सोलापूर | १८.८५ कोटी | १७७९४६ | ७० | ८८९७३० | |
सातारा | ८४.८५ कोटी | १०४६७९५ | ९६ | ५२३३९७५ | |
एकूण | २१७.४६ कोटी | २५,५४,२९४ | ४५३ | १,२७,७१,४७० |
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन