21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अमर एफसी, खडकी युनायटेड संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, दि.11 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमर एफसी, खडकी युनायटेड या संघांनी अनुक्रमे फातिमा इलेव्हन व स्ट्रायकर्स एफसी या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सीओईपी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमर एफसी संघाने फातिमा इलेव्हन संघाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सामन्यात अमर एफसी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. 18व्या मिनिटाला गौरव स्वामीनाथनच्या पवार यश पवारने सुरेख गोल करून संघाचे खाते उघडले. फातिमा इलेव्हनच्या आघाडीच्या फळीने हि पिछाडी भरून काढण्यासाठी जोरदार प्रयन्त केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर पूर्वार्ध संपण्यास एकच मिनिट शिल्लक असताना साहिल जगतापने दिलेल्या पासवर यश पवारने आणखी एक गोल करून संघाची आघाडी 2-0 ने वाढवली.

उत्तरार्धात फातिमा इलेव्हनच्या एडविन अँथोनी, ऍन्सन डिसुझा यांनी जोरदार चढाया केल्या, पण अमर एफसी संघाने आपला बचाव अभेद्य ठेवत गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. सामन्याच्या शेवटपर्यंत अमर एफसी संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामन्यात 2-0अशा फरकाने विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात खडकी युनायटेड संघाने स्ट्रायकर्स एफसी संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. खडकी युनायटेडकडून सॅम्युएल हंसदक, जयंत निंबाळकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर स्ट्रायकर्स एफसीकडून यश झुनझुनवालाने एकमेव गोल केला. आज स्पर्धेप्रसंगी लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी भेट दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
अमर एफसी: 2(यश पवार 18मि.(पास-गौरव स्वामीनाथन), यश पवार 44मि.(पास-साहिल जगताप))वि.वि.फातिमा इलेव्हन: 0;

खडकी युनायटेड: 2(सॅम्युएल हंसदक 18मि.(पास-विनीत पिल्ले), जयंत निंबाळकर 57मि.(पेनल्टी)वि.वि.स्ट्रायकर्स एफसी: 1(यश झुनझुनवाला 50मि.(पास-दिनेश थापा).

आजचे, 12जानेवारी 2023 सामने: उपांत्यपूर्व फेरी:
ईगल्स वि.क्रिसेंट एफसी – 1:00 वाजता;
बघिरा एफसी वि.सीएमएस फाल्कन्स अ – 2:30 वाजता;