पुणे: ‘पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत 22 संघ सहभागी

पुणे, दि.7 जानेवारी 2023: मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 22 संघांमध्ये 220हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.8 जानेवारी  2023पासून सुरु होणार आहे.
 
स्पर्धेला आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत विजेत्या संघाला 20 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 10हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, महाराष्ट्र मंडळ, एफसी जीएनआर, टेनिसनट्स रॉजर यांसह मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन, टायगर्स,  टेनिसनट्स आरएएफए, ऍव्हेंजर्स, ग्लॅडिएटर्स, एफसी 3, सोलारिस गोगेटर्स, एमडब्लूटीए, एमडब्लूटीए 3, एफसी 4, एफसी 1, एमडब्लूटीए 2, ओडीएमटी 1, एसेस युनायटेड, ईगल्स, एफसी 2, एमडब्लूटीए 4, लॉ चार्जर्स, हे संघ झुंजणार आहेत.
 
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 2 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने होणार आहेत.