पुणे, 23 जानेवारी 2023: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत ईश्वरी माथेरे, प्रियांशी भंडारी, सोहा सादिक, हुमेरा बहरामुस, युब्रानी बॅनर्जी, शर्मदा बाळू, पावनी पाठक या भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागल्याने पात्रता फेरीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत चुरशीच्या लढतीत सातव्या मानांकित रशियाच्या अनास्तासिया सुखोतिनाने भारताच्या पावनी पाठकचा 7-5, 7-5असा पराभव केला.जपानच्या नवव्या मानांकित फुना कोझाकी हिने सहाव्या मानांकित मेई यामागुचीचा 3-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित जपानच्या एरी शिमिझू हिने भारताच्या अकराव्या मानांकित हुमेरा बहरामुसचे आव्हान 6-3, 6-2 असे मोडीत काढत मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
मना कावामुरा(जपान)वि.वि.ईश्वरी माथेरे (भारत)6-0, 6-1
गोझल ऐनितदिनोवा (कझाकस्तान )[1]वि.वि.प्रियांशी भंडारी (भारत) 6-1, 6-0
एमिली वेलकर (जर्मनी ) [4] वि.वि.सोहा सादिक (भारत) 6-3, 6-4
फुना कोझाकी(जपान) [9] वि.वि.मेई यामागुची(जपान) [6] 3-6, 6-1, 6-3
एरी शिमिझू (जपान) [2]वि.वि.हुमेरा बहरामुस(भारत )[11] 6-3, 6-2
टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) [5]वि.वि.युब्रानी बॅनर्जी (भारत) [15] 6-4, 6-3
केसेनिया झायत्सेवा (रशिया)[8] वि.वि.शर्मदा बाळू (भारत) [10] 6-0, 6-3
अनास्तासिया सुखोतिना (रशिया) [7] वि.वि.पावनी पाठक (भारत)7-5, 7-5
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा