22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीतच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे, 22 जानेवारी 2023: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या प्रियांशी भंडारी, ईश्वरी माथेरे, पावनी पाठक, जपानच्या मना कावामुरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत जपानच्या मना कावामुराने तिसऱ्या मानांकित भारताच्या झील देसाईचा 6-3, 6-0 असा पराभव केला. पावनी पाठक हिरेन तेराव्या मानांकित श्रेया ताटावर्तीचे आव्हान 6-1, 6-2 असे सहज मोडीत काढले. प्रियांशी भंडारीने चौदाव्या मानांकित स्मृती भसीनला 6-4, 6-3 असे पराभूत केले. ईश्वरी माथेरे हिने सोळव्या मानांकित फरहत अलीन कमरचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:

गोझल ऐनितदिनोवा[1] (कझाकस्थान)वि.वि.पूजा इंगळे(भारत)6-0, 6-1;
प्रियांशी भंडारी(भारत)वि.वि.स्मृती भसीन(भारत)[14] 6-4, 6-3
एरी शिमिझू (जपान) [2]वि.वि.समीक्षा श्रॉफ(भारत)6-0, 6-1
हुमेरा बहरमस(भारत)[11]वि.वि.चंदना पोतुगरी(भारत)6-4, 6-4
मना कावामुरा (जपान)वि.वि.झील देसाई (भारत)[3] 6-3, 6-0;
ईश्वरी माथेरे(भारत)वि.वि.फरहत अलीन कमर(भारत)[16] 6-3, 6-3

एमिली वेलकर(जर्मनी)[4]वि.वि.बेला ताम्हणकर(भारत)6-0, 6-3

टीना नादिन स्मिथ(ऑस्ट्रेलिया)[5]वि.वि.अंजली राठी((भारत)6-0, 6-1

युब्रानी बॅनर्जी (भारत)[15]वि.वि.सौम्या विग(भारत)6-2, 5-7, 6-3

मेई यामागुची(जपान)[6]वि.वि.मधुरिमा सावंत(भारत)6-2, 6-0

फुना कोजाकी (जपान)[9]वि.वि.अविष्का गुप्ता(भारत)6-1, 6-1

अनास्तासिया सुखोतिना [७] बीटी कुंडली मजगेन(भारत)6-0, 6-1;

पावनी पाठक (भारत) वि.वि.श्रेया ताटावर्ती (भारत)[13] 6-1, 6-2
केसेनिया झायत्सेवा[8]वि.वि.लालित्य कल्लुरी(भारत)6-1, 6-1

शर्मदा बाळू (भारत)[10]वि.वि.जगमीत कौर(भारत)6-4, 5-7, 6-2