पुणे, 7 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटना व एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या तर्फे दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर 10 व 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अध्यक्ष रणजीत मोरे, सचिव सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचा कर्णधार व माजी रणजीपटू रणजित खिरीड,
बीयु भंडारी ऍथेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश बोराडे आणि एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण यांनी सांगितले कि, बीव्हीसीआय वय म्हणजे फक्त एक संख्या अशा प्रमुख ध्येयाने काम करते. ज्या समाजात वयाच्या चाळीसा्या वर्षी निवृत्तीचा विचार करणे आणि वयाच्या साठाव्या वर्षी निश्चत निवृत्ती घेणे अपेक्षित असते, तेथे बीव्हीसीआय चाळीस वर्षापासून संघांमध्ये नाव नोंदणी करण्यास सुरवात करते. आमच्याकडे तीन वयोगट आहेत, ते आमचे सतत लक्ष केंद्रित करतात. यामध्ये ४०, ५० आणि ६० वर्षांहून अधिक अशा वयोगटांचा समावेश आहे. देशांतर्गत क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय आणि विश्वचषकासाठी जे प्रशिक्षण दिले जाते ते व्यावसायिक प्रशिक्षण बीव्हीसीआय तुम्हाला देते.या स्पर्धेच्या माध्यमातून आमची संघटना व सरकारी संस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, या हेतूने या मैत्रीपूर्ण कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेला मॅजेस्टिक रिअल्टीज यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून बीयु भंडारी ऍथेर, सुहाना मसालेवाले, कुमार प्रॉपर्टीज, राजसा कलेक्शन यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.
स्पर्धेत इन्कम टॅक्स टायगर्स, जीएसटी जायंट्स, पीएमसी टायटन्स, ग्रामीण चॅलेंजर्स, पोलीस वॉरियर्स आणि चॅरिटी लिजेंड्स हे 6 संघ सहभागी झाले आहेत.
तसेच, हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय