पुणे, दि. १३ मे २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलमधील १ कोटी ४५ लाख ५८ हजार ८६ रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली ३४१ प्रकरणे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. यामध्ये दोन वीजचोरीच्या प्रकरणांतील वीजबिल व तडजोड शुल्काच्या ५९ लाख २७ हजार रुपयांचा समावेश आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकीत वीजबिलांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक रास्तापेठ मंडलमधील ६५ लाख २५ हजार ९५६ रुपयांची २६६ प्रकरणे, पुणे ग्रामीण मंडलमधील ४३ लाख ६५ हजार रुपयांची ४२ तर गणेशखिंड मंडलमधील ३६ लाख ६७ हजार रुपयांची ३३ प्रकरणे असे एकूण १ कोटी ४५ लाख ५८ हजार रुपयांचे ६७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच कलम १३५ अन्वये दोन वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये वीजबिल व तडजोड शुल्कापोटी एकूण ५९ लाख २७ हजार रुपयांचा भरणा केला.
या लोकअदालतमध्ये महावितरणकडून प्रभारी विधी सल्लागार श्री. दिनकर तिडके, विधी अधिकारी नीतल हासे, गणेश सातपुते, अंजली चौगुले यांच्यासह अभियंते, लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार