पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत पहिल्या दिवशी साडे तीन हजार जणांनी साधला हेल्पलाईनली संपर्क

पुणे, १२/०७/२०२१: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात  येणाऱ्या द्वितीय सत्रातील परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसशी ७४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, यूजर नेम , पासवर्ड आदींची माहिती विचारण्यासाठी ३ हजार ५०० च्या वर कॉल आले तर ४५० च्या वर चॅट रिक्वेस्ट आल्याआल्या होत्या.  अशी माहिती परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.यामध्ये ७६ हजार ९६९ जणांपैकी ७४ हजार ७७२ जणांनी परीक्षा दिली. ९७.१५ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

परीक्षेत कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. या परीक्षेदरम्यान पहिल्यांदाच आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. या सर्व आवाजाची तपासणी केली जाईल व त्यांनतर यातील कॉपी केसेस असल्यास त्या जाहीर केल्या जातील, असे काकडे यांनी सांगितले.