राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यामुनानगर येथे 50 बेडच्या विलागीकरण कक्षाची उभारणी

पिंपरी दि.१९ एप्रिल २०२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने यमुनानगर येथे 50 बेडचे आयसोलेशन कोविड सेंटर उभारण्यात आले आहे त्याची पाहणी आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली.

यावेळी जिल्हा संघचालक – विनोदजी बन्सल, जिल्हा कार्यवाह – महेश्वर मराठे, हेमंत हरहरे – पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य व स्थानिक नगरसेवक व क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.

सामाजिक संघटना कोविड नियंत्रणासाठी पुढाकार घेत आहे, त्यामुळे महापालिकेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या. इतर संघटनांनी देखील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.