पुणे, 24 डिसेंबर 2025: सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी 25 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा सचिव सुधांशु मेडसीकर यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर बॅडमिंटनला खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आम्ही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
ही स्पर्धा पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली 9,11,13,15,17, 19 वर्षाखालील मुले व मुली एकेरी व दुहेरी गट, पुरुष एकेरी व दुहेरी गट, 30 वर्षांवरील एकेरी या गटात पार पडणार आहे. स्पर्धेत मल्हार भोसले, रवी कदम, अर्चित खान्देशे, कियारा साखरे, सिद्धार्थ सामंत, आरोही देसाई, अन्वय समग, निष्ठा भंडारी, ईशान लागू, लाभा मराठे, कार्तिक दिनेश, निनाद कुलकर्णी हे मानांकित खेळाडू झुंजणार असल्याचे मेडसीकर यांनी सांगितले.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप