पुणे, 13 जानेवारी 2024: पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पीडीसीसी जिल्हा 7,9,11,13, 17 वर्षाखालील
निवड बुद्धीबळ स्पर्धेत जिल्ह्यातून 528 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल आणि श्री गणेश सभागृह या ठिकाणी 14 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला अमानोरा आणि ट्रुस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण 40,000रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात किंवा आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत अनुष्का कुतवळ(1495), विरेश शरणार्थी(1812), निहिरा कौल(1406), आर्यन करमळकर(1512), आदित्य जोशी(1564), इरा बोहरा(1041) यांसारखे मानांकित खेळाडू आपले कौशल पणाला लावणार आहेत. तसेच, हि स्पर्धा 7,9,11,13, 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होणार आहे. स्पर्धेसाठी आयए विनिता श्रोत्री चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्र्विन त्रिमल आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते 14 जानेवारी रोजी सकाळी 9.15वाजता करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय