पुणे, 23 जून 2021: शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार दर्जाचे 575 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास पोलीस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला.
पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार दर्जाचे पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचनेनुसार, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (आस्थापना) श्मच्छींद्र चव्हाण, प्रशासकीय अधिकारी शशिकला भालचिम यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या शिफारशीनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 200 पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस फौजदार या पदावर, 249 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर, तर 126 पोलिस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
यापुर्वी या वर्षामध्ये फेबु्वारी व एप्रिलमध्ये पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 172 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली होती.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद