१८ डिसेंबर २०२२ रोजी संपर्क बालग्राम तर्फे हेरिटेज वॉक (पदयात्रा ) चा ५ वा कार्यक्रम

पुणे २२ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्रातील वैभवशाली किल्ले, लेणी आणि ऐतिहासिक वास्तूबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून, तसेच अनाथ मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करणारी स्वयंसेवी संपर्क संस्था ही ५ व्या वेळेस १८ डिसेंबर २०२२ रोजी भव्य सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन करत आहे.

हेरिटेज वॉकची सुरुवात ही २०१६ मध्ये संपर्क बालग्राम चे मुख्य ठिकाण असलेल्या भाजे गावात करण्यात आली होती. यामध्ये ३. ६ किमी अंतर चालल्यावर विसापूर व लोहगड किल्ले, भाजे लेणी,आणि बेडसे लेणी आणि अशा चार ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत.

सकाळी ८. ३० वाजता भाजे लेणीच्या पायथ्याजवळून पदयात्रेला ध्वजवंदन करून पदयात्रेला सुरुवात केली जाईल. हि पदयात्रा एक आनंदोत्सव असणार आहे. या पदयात्रेमध्ये ३२ प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. ज्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे. या पदयात्रेमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होणार आहे. तसेच सहभागींना महाराष्ट्रातील ५ वेगवेगळ्या ठिकाणच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. भाजे आणि लोहगड ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या गावांमधील सुमारे ४५० स्थानिक लोक आणि संपर्क संस्थेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक हे सामुदायिक व्यक्ती आणि पर्यटकांसह पदयात्रेमधे सहभागी होणाऱ्या ८००० लोकांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत.

पत्रकार परिषदेत संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुजकुमार सिंग हे म्हणाले की, २०१६ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश हा विशेषत:. ह्या पाच सुंदर ठिकाणांबद्दल पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच पुणे आणि मुंबईतील लोक जे वर्षभर मोठ्या संख्येने लोणावळ्याला भेट देत असतात त्यांना सांस्कृतिक वारसा जपण्याची भावना निर्माण करणे हा होता. या उपक्रमामुळे या भागातील पर्यटनाला चांगल्याप्रमाणात चालना मिळाली आहे. जेव्हा आम्ही पदयात्रेला सुरुवात केली तेव्हा परिसरात पर्यटकांना राहण्यासाठी फक्त एक किंवा दोनच घरांची सोय होती पण आज जवळपास प्रत्येक घर आपल्या घरी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटकांची संख्या किमान तीन पटीने वाढली आहे.

संपर्क संस्थेचे संस्थापक श्री.अमितकुमार बॅनर्जी म्हणाले की, महाराष्ट्राच्या या अतिप्राचीन वास्तुची नोंद ही युनिस्को मध्ये करणे हे आमचे अंतिम उद्देश आहे. आणि ह्याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ की, ज्यामुळे ह्या ऐतिहासिक वास्तू जागतिक स्तरावर ओळखल्या जातील.

श्री.अमितकुमार बॅनर्जी यांचा विश्वास आहे की, संपर्क हेरिटेज वॉक हे केवळ ४-५ स्मारकांसाठी नाही तर महाराष्ट्रातील ८०० लहान-मोठ्या लेण्या आणि २७६ किल्ले या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही पदयात्रा एक चळवळ म्हणून नवीन संकल्पना निर्माण केलेली आहे.

ते पुढे म्हणाले की, सामुदायिक आणि वैयक्तिक व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होतात. आणि संकलित केलेल्या निधीचा उपयोग चार राज्यातील सहा ठिकाणी संपर्क बालग्राम अनाथाश्रम चालविण्यासाठी केला जातो.

भाजे लेणीच्या पायथ्याशी संपर्क संस्था ही १३५ अनाथ मुलींच्या संगोपन आणि संरक्षणाची काळजी घेते. हेरिटेज वॉक पदयात्रा हि संपर्क अनाथ आश्रमाच्या ५ किमी अंतरात आहे

Join SAMPARC Heritage Walk through Website https://SAMPARCheritagewalk.com and visit YOUTUBE link https://youtu.be/6qGLLwi4_rk