५ वी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा : पंचपीर स्पोर्ट्स क्लब , मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघ पराभूत

पुणे, १० नोव्हेंबर, २०२१ : झारखंडच्या रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाने भिवनीच्या पंचपीर स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून ५ व्या एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत आपली विजयी घौडदौड कायम ठेवत बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. मंगळवारी सायंकाळी झालेला लढतीत रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटराने मुंंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा पराभव केला होता.

एसएनबीपी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युटच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ड गटाच्या सामन्यात झारखंडच्या रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाने भिवनीच्या पंचपीर स्पोटर््स क्लबच ४- १ गोलने पराभव केला. रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाच्या अनूज बाराने १२ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी दिली. नंतर १४ व्या मिनिटाला हर्षित इंदवारने दुसरा गोल करून आघाडी वाढविली. नंतर तिसºया सत्रात ४० व मिनिटाला पुन्हा हर्षित इंदवारने दुसरा गोल केला. ४१ मिनिटाला फिलिप गुरीयाने संघाचा चौथा गोल केला. पराभूत
पंचपीर स्पोर्ट्स क्लब संघाचा एकमेव गोल ५३ व्या मिनिटाला भरत कौशिकने केला.

मंगळवारी सायंकाळी झालेला सामना रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाने मुंंबई स्कूल स्पोटर््स असोसिएशन संघाला ४-२ गोलने पराभूत केले होते. ड गटात रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर संघाने दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांनी ६ गुणांची कमाई करीत बाद फेरीतील आपल्या जागा निश्चित केली.

इ गटाच्या लढतीत नागपूर हॉकी अकॅडमीने हॉकी युनिय ऑफ तमिलनाडू संघाचा १० शून्य गोलने धुव्वा उडविला. सुरूवातीपासूनच नागपूर अकॅडमीच्या खेळाडूंनी पासिंगचे योग्य नियोजन करीत सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरूवात केली. सामन्याच्या ९ व्या मिनिटाला नागपूर हॉकी अकॅडमीच्या अमरजीत सिंगने फिल्ड गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले.

नंतर नागपूर अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या घन:शाम यादवने ३ गोल (२२, ३३, ३५ मिनिट), संदिप शर्माने २ (१५ व ३४ मिनिट), हिमांशू यादवने १२ व्या, प्रशांत मिश्राने ४८ व्या, रंजीत राजभारने ५१ व्या व जयहिंद यादवने ५३ व्या मिनिटाला गोल केले. पराभूत हॉकी युनिटी ऑफ तमिलनाडू संघाचे खेळाडू एकही गाल करू शकले नाही.

एफ गटाच्या झालेल्या लढतीत पटणाच्या आर. के. रॉय अकॅडमीने हॉकी नाशिक संघाचा १६-२ गोलने धुव्वा उडविला. आर. के. रॉय अकॅडमीच्या एमडी दानिशने ७ गोल केले. त्यांच्या सुरज कुमार व सचिन कुमारने दोन, दोन तर ज्योतिश कुमार, धनंजय कुमार १, एम. डी. अलिशान १, एम. डी. आतिफ १ व रोशन राजने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत हॉकी नाशिक संघाकडून कार्तिक पठारे दोन गोल केले.
निकाल :

ड गट : रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर : ४ गोल (अनूज बारा १, हर्षित इंदवर २, अर्जुन समद १ गोल) वि. वि. पंचपीर स्पोर्ट्स क्लब भिवानी १ गोल (भरत कोैशिक १ गोल). मंगळवारी सायंकाळी झालेला सामना : रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर : ४ गोल (अनूज बारा ३, फिलिप गुरीया १) वि. वि. मुंंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन : २ गोल (कायले परेरा १, सिराज अहमद १ गोल).

एफ गट : आर. के. रॉय अकॅडमी, पटणा : १६ गोल (एमडी दानिश ७ गोल, कुमार ज्योतिश १, सुरज कुमार २, सचिन कुमार २, धनंजय कुमार १, एमडी अलिशान १, एम. डी. आतिफ १, रोशन राज १, ) वि. वि. हॉकी नाशिक : २ गोल (कार्तिक पठारे २ ).

सी गट : सेल हॉकी अकॅडमी, ओडिसा : ७ गोल (अनमोल एक्का ज्यु. ४, अनुप ब्रु सेबियान १, सोनू निशाद १, रूतिक कुजुर १) वि. वि. स्मार्ट हॉकी अकॅडमी , रायपूर : शून्य गोल.

इ गट : नागपूर हॉकी अकॅडमी : १० गोल (घन:शाम यादव ३, अमरजीत सिंग १, संदिप शर्मा २, हिमांशू यादव १, प्रशांत मिश्रा १, रंजीत राजभार १, जयहिंद यादव १) हॉकी युनिटी ऑफ तमिलनाडू : शून्य गोल.
* जी. गट : एसएनबीपी अकॅडमीला पुढे चाल (केरळचा पीएमएसएएमएएचएसएस संघ गैरहजर)