पुणे, 09 नोव्हेंबर 2024 : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पत्राशेड किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात आलेले ७ जुने मतदान केंद्र नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार मतदान केंद्रावर मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे.
यादी भाग ७४-स्पायसर कॉलेज प्राथमिक शाळा औंध हे मतदान केंद्र रोहन निलय-१ सहकारी हौसिंग सोसायटी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. यादी भाग १३४-स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, मनपा, विद्यानिकेतन, विद्यापीठ गेट, गणेशखिंड रोड येथील मतदान केंद्र १० कस्तुरकुंज सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग ७६-पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे असणारे मतदान केंद्र माऊंट व्हर्ट पीर्सस्टाईन सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग २५२ आणि २५३-सिंम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रस्ता येथील मतदान केंद्र कपिला सहकारी हौसिंग सोयायटी, गोखले नगर येथे तर यादी भाग ४६-आरोग्य कोठडीमध्ये असलेले मतदान केंद्र पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
यादी भाग १६२ आणि १६३-तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र सेंट फ्रांसिस हायस्कूल, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर येथे तर यादी भाग २६२-तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र हे शासकीय तंत्रनिकेतन व वाणिज्य केंद्र, घोलेरोड येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, असे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.