राष्ट्रीय युद्ध स्मारक दक्षिण कमांड, पुणे येथे 75 वा स्वातंत्र्य दिन

पुणे, १५ ऑगस्ट २०२१: 75 वा  स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय युद्ध स्मारक, दक्षिण कमांड ,पुणे येथे साजरा करण्यात आला. देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करताना कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारताच्या शूर योद्ध्यांना आज स्वातंत्र्यदिनी  दक्षिण कमांडचे स्टेशन कमांडर, ब्रिगेडियर आर आर कामथ  यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक पुणे येथे आदरांजली वाहिली.

सध्या सुरु असलेल्या कोविड -19 महामारीमुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा झाला. पुणे स्टेशनवरील निवडक लष्करी जवान पुष्पचक्र अर्पण सोहळ्याला उपस्थित होते.