October 22, 2025

दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसने केला निषेध

पुणे, २३ एप्रिल २०२५ ः जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे सामान्य पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. व श्रद्धांजली सभा. झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होता.

पाकिस्तानच्या विरोधात अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘अतिशय नियोजनबध्द अतिरेक्यांतर्फे हा हल्ला करण्यात आलेला आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये पुन्हा अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्‍यवस्था नव्‍हती, याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यानी या हल्ल्यामागच्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील जे पर्यटक व इतर पर्यटक या अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.’’

माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, नितीन परतानी, प्राची दुधाने, ॲड. राजश्री अडसूळ, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सोशल मिडीया अध्यक्ष गुलामहुसेन खान, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, रवि पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, द. स. पोळेकर, गणेश गुगळे, राज जाधव, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, ॲड. फैय्याज शेख, अविनाश अडसूळ, यासीन शेख, सचिन सावंत, अभिजीत महामुनी, सद्दाम शेख, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, लतेंद्र भिंगारे, मनोहर गाडेकर, कृष्णा सोनकांबळे, मंदा जाधव, कल्पना शंभरकर आदी उपस्थित होते.