पुणे, २४ एप्रिल २०२५: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात ढेकणांचा प्रचंड त्रास सुरू असून त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ढेकणांच्या चावण्यामुळे शरीरावर पुरळ, जळजळ व झोपेचा त्रास होत असून विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
या समस्येवर वेळोवेळी वसतिगृह प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (एबीव्हीपी) पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळेच ही समस्या वाढीस लागल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच उंदरांच्या चाव्याचा प्रकार घडला होता आणि आता ढेकणांचा उपद्रव विद्यार्थ्यांना त्रस्त करत आहे.
विद्यार्थ्यांचे सध्या पेपर सुरू असल्याने या त्रासामुळे त्यांच्यावर मानसिक ताणदेखील वाढला आहे. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास एबीव्हीपी आंदोलन छेडण्याची भूमिका घेईल, असा इशाराही संघटनेचे प्रतिनिधी शिवा बारोळे यांनी दिला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळून तात्काळ कीटकनाशक फवारणीसह इतर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

More Stories
पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप
Pune: कात्रज बायपास मार्गावर आता ४० किमी/तास कमाल वेग बंधनकारक; पोलीस उप-आयुक्तांची आदेशिका लागू
Pune: शिवणे–खराडी रस्त्याच्या रखडलेल्या कामावर श्वेतपत्रिका जाहीर करा : खर्डेकर यांची मागणी