पुणे, १२/०५/२०२५: गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे.मात्र चीन आणि तुर्की कडून पाकिस्तानला पाठिंबा देण्यात आलं आहे.अस असताना पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्की वरून येणाऱ्या सफरचंद वर बहिष्कार घातला आहे.यामुळे पुण्यातील मार्केटयार्ड मधून तुर्कीच सफरचंद गायब झाल आहे.
पुण्यातील पुणे बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथे जगभरातील विविध देशातून सफरचंद ची आवक होत असते.तुर्कीच्या सफरचंद ची आवक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते.भारत पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशभरात बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलं जात आहे.आणि त्याच अनुषंगाने पुण्यात देखील लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलं आहे ज्यात मार्केटयार्ड मध्ये येणार तुर्कीच सफरचंद येण्यास बंद झाल आहे.इतर देशातून येणाऱ्या सफरचंद ला नागरिक पसंती देत आहे.
याबाबत पुण्यातील मार्केटयार्ड येथील सफरचंद व्यापारी
सुयोग झेंडे म्हणाले की सध्या तुर्की येथील आपल्या इथ सफरचंद येत आहे.पुढील पंधरा दिवसांनी चेरी,पलम, पीस यायला सुरुवात होणार आहे.त्यांच्याकडून इम्पोर्ट च सीझन हा तीन महिन्यांचं असतो.सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे.मात्र तुर्की कडून पाकिस्तानला जाहीर पाठिंबा देण्यात आलं आहे.यामुळे देशभक्ती म्हणुन लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवलं आहे आणि लोक डायरेक्ट सफरचंद खरेदीला विरोध करत आहे.या तीन महिन्यांच्या सीझन मध्ये जवळपास एक हजार कोटीचा टर्नओव्हर होत असतो आणि आत्ता तुर्कीवर बॅन घातल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन मोठं नुकसान होणार आहे.जो देशाचा दुश्मन तो आपलं दुश्मन असून फक्त सीमेवरून जवानांनी युद्ध न लढता आपण देखील देशभक्ती म्हणून आपलं कर्तव्य म्हणून तुर्कीला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.म्हणून आत्ता आम्ही देखील तुर्की च्या सफरचंद वर बहिष्कार घातला आहे.
यावेळी एका ग्राहकाने सांगितलं की ज्या पद्धतीने जाहीर रित्या तुर्की ने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे ते पाहता देशाप्रती नागरिक म्हणून आत्ता आम्ही देखील तुर्कीच्या सफरचंद वर बहिष्कार घातल असून आम्ही त्यांचे सफरचंद खरेदी बंद केली आहे.अस देखील एका ग्राहकाने यावेळी सांगितलं.
More Stories
Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा
Pune: रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमवेत पाहणी
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त