September 12, 2025

पुणे: मेट्रोचे काम करताना जलवाहिनी फुटली

पुणे, १२ मे २०२५ः शिवाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी शिमला ऑफिस येथे मेट्रोचे काम करताना फुटल्याचा प्रकार आज (ता. १२) दुपारी घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ही घटना घडतात मेट्रोने त्वरित दुरूस्ती करून ही गळती थांबवली.

उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. कमी दाबाने व उशिरा येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक वैगातले आहेत. प्रशासनाकडे तक्रारी करून पाणी सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. तरीही पाणी येत असल्यानो महापालिकेच्या टँकरची मागणी वाढली आहे. खासगी टँकर चालकांनाही मोठी मागणी असल्याने टँकरवर हजारो रुपये खर्च होत आहेत. त्यातच शिवाजीगर येथे शिमला ऑफिसच्या जवळ जलवाहिनी फुटल्याने हवेत १० ते १२ फूट उंच उडत होते.

शिमला ऑफिस चौकातील जलवाहिनी ही लष्कर जलकेंद्रावरून आलेली आहे. त्यातून गणेशिंखड रस्ता, जुना मुंबई पुणे महामार्ग आदी परिसरात पाणी पुरवठा केला जातो. दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु होते, तेव्हा जेसीबीची धक्का बसल्याने जलाहिनी फुटली. कारंजा उडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मेट्रो याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व लगेच त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरु केले. तरीही हे काम पूर्ण होई पर्यंयत बरेच पाणी वाया गेले. ही जलवाहिनी फुटली तेथील स्ता वाहतुकीला बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली नाही.

अधिक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी म्हणाले, लष्कर भागातून येणाऱ्या जलवाहिला जोडलेली छोटी जलवाहिनी मेट्रोचे काम करताना फुटली. मेट्रोने त्वरित दुरूस्तीचे काम करून गळती थांबविली. जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालेला नाही.