पुणे, २७ मे २०२५: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी), पुणे आणि परिसरासाठी आगामी २४ तासांसाठी महत्त्वाचा पावसाचा इशारा दिला आहे. शहरात हलक्या ते मध्यम पावसासह घाट भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ही स्थिती बुधवारपर्यंत (२८ मे) कायम राहण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार सरी पडल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद (२७ मे सकाळी ८.३० पर्यंत पाऊस मिलिमीटरमध्ये):
पाषाण – ५१.४ मिमी
चिंचवड – ४७.० मिमी
लोहेगाव – ४६.४ मिमी
शिवाजीनगर – ४२.१ मिमी
एनडीए – ४०.५ मिमी
मगरपट्टा – १४.५ मिमी
कोरेगाव पार्क – ७.५ मिमी
सकाळी ८.३० ते दुपारी २.३० दरम्यानच्या पावसाची नोंद:
चिंचवड – २४.५ मिमी
लोहेगाव – २१.० मिमी
एनडीए – २२.५ मिमी
मगरपट्टा – १७.५ मिमी
पाषाण – १२.५ मिमी
शिवाजीनगर – १२.६ मिमी
कोरेगाव पार्क – २.० मिमी
२८ मेसाठी हवामान अंदाज:
पुणे शहरात आकाश मुख्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. घाट भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे.
संभाव्य परिणाम:
-वाहतूक कोंडी आणि दृष्यमानतेमध्ये घट
-सखल भागांत व नदीकाठी पाणी साचण्याची शक्यता
-झाडांच्या फांद्या तुटून पडण्याची शक्यता
-घाटांमध्ये छोट्या प्रमाणावर भूस्खलन किंवा चिखलसरी होण्याचा धोका
हवामानखात्याकडून नागरिकांसाठी सूचना:
-वीजांच्या कडकडाटादरम्यान झाडाखाली थांबू नका
-विजेच्या काळात मोबाईलचा वापर टाळावा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत
-जोरदार वाऱ्यांदरम्यान खिडक्या व दरवाजे बंद ठेवावेत
-अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा
-पावसामुळे रस्ते ओले व निसरडे होऊ शकतात, त्यामुळे सावधपणे वाहन चालवावे
तापमानाचा कल (२७ मे ते २ जून):
-कमाल तापमान: २८°C ते ३२°C
-किमान तापमान: २१°C ते २५°C
दरम्यान पुढील सहा ते सात दिवस शहर व परिसरात ढगाळ हवामान आणि हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर येत्या २९ मेपर्यंत घाट भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
More Stories
Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा
Pune: रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमवेत पाहणी
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त