पुणे, २९ मे २०२५ ः महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून उदयोन्मुख ३४४ खेळाडूंना ८७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे गुरुवारी वाटप केले. खेळाडूंना स्पर्धा साहित्य खरेदी किंवा स्पर्धेच्या तयारीसाठी महापालिकेने दिलेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग होतो.
बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, मालमत्ता व आस्थापना विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या क्रीडा विभागाअंतर्गत सुधारीत क्रीडा धोरणानुसार १८ योजना राबविल्या जातात. त्यामधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेने या शिष्यवृत्तीसाठी खेळाडूंना आवाहन केल्यानंतर ७४३अर्ज महापालिकेस प्राप्त झाले होते. त्यापैकी ३४४ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पात्र खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये इतक्या रकमेचे धनादेश खेळाडूंना वाटप करण्यात आले. महापालिकेच्या शाळांमधील ३७ खेळाडूंना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ कांबळे व राष्ट्रीय खेळाडू सुचिता खरवंडीकर या खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले

 
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                 
                                         
                                         
                                         
                                        
More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण