पुणे, ०१/०६/२०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी कोंढवा येथील कार्यकर्ते हाजी फिरोज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी मिळाला असल्याची भावना निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हाजी फिरोज शेख यांचा अल्पसंख्याक समाजाचे नेते रशिद शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिया ब्रदर्स कम्युनिटीचे खिसाल जाफरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
हाजी फिरोज हे सुमारे पंचवीस वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सन 2017 च्या मनपा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. परवीन हाजी फिरोज यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार चेतन तुपे यांच्या विजयामध्ये देखील हाजी फिरोज यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. दरम्यान, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा कोंढवा व उर्वरित भागातून मुस्लिम लोकप्रतिनिधी निवडून आणणे व मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार