पुणे, ३१ मे २०२५: आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ५ कार्यालयात मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजातील प्रतिनिधी, पुणे महानगरपालिका व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी तसेच कत्तलखान्याचे मुकादम यांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. यामध्ये बकरी ईद साजरी करताना येणाऱ्या अडचणी, नियमांचे पालन, वाहतूक व्यवस्थापन, बकरा बाजार, अवैध वाहतूक व कत्तलखाने, मस्जिदवरील भोंगे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मौलाना व ट्रस्टींना शासनाच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना समजावून सांगण्यात आल्या. तसेच कायद्याचे उल्लंघन टाळून शांततेत व सुव्यवस्थेत सण साजरा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
बैठकीस परिमंडळ ५ अंतर्गत हडपसर व वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, नऊ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे महापालिका व कॅन्टोन्मेंट विभागातील अधिकारी, तसेच मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजातील नागरिक असा ७० ते ८० जणांचा सहभाग होता.
या बैठकीद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये सुसंवाद व सहकार्याचा संदेश देण्यात आला असून, बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार