September 12, 2025

तावरे कॉलनी, महर्षीनगरसह अनेक भागांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पुणे, ३ मे २०२५: पुणे महानगरपालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी जोडणी व दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे गुरुवारी, दिनांक ५ मे रोजी तावरे कॉलनी, महर्षीनगरसह अनेक भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ६) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल.

या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पाणी पुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे –
तावरे कॉलनी, वाळवेकर नगर, सातारा रस्ता, इलेक्ट्रॉनिक इस्टेट, पर्वती इंडस्ट्रिअल इस्टेट, ट्रेझर पार्क, अण्णाभाऊ साठे वसाहत, संतनगर, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, शिवदर्शन, अरण्येश्‍वर, महर्षीनगर, आदर्शनगर, मुकुंदनगरचा काही भाग, प्रेमनगरचा काही भाग, गुलटेकडी व मार्केटयार्डचा काही भाग.