पुणे, १० जून २०२५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोल्फ क्लब, येरवडा येथे ११ जून २०२५ पासून https://hmas.mahaait.org संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन गृहपाल आर. एस. तांगडे यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवासाची व्यवस्था, सुसज्य वाचनालय, व्यायाम शाळा आदी सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून मासिक निर्वाह भत्ता तसेच इतर अनुदान देण्यात येते. या वसतिगृहात कनिष्ठ माविद्यालयातील १० वी नंतर ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांस जात प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थी ११ वी उत्तीर्ण झाल्यावर गुण-पत्रिका, बोनाफाईड व उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करुन इयत्ता १२ वी चा वसतिगृह प्रवेश नूतनीकरण करुन प्रवेश निश्चित होतो. या प्रमाणे कुठल्याही व्यावसायिक अथवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सुरुवातीस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो.
अधिक माहितीसाठी गृहप्रमुख जे. डी. मोहोळे (भ्र. क्र. ९९२३११८७४०), गृहपाल आर. एस. तांगडे (भ्र. क्र. ९९६०९७४१००) यांच्याशी संपर्क साधावा, असेही एका परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार