पुणे, १६ जून २०२५: सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही व एअर फोर्स मधून सेवानिवृत्त झालेल्या (राखीव यादीत नसलेले) माजी सैनिकांनी नागरी संरक्षक दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी.
पुणे जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी व नोंदणी करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार