पुणे, दि.१ जुलै २०२५: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पाचव्या पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत ७२ खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. ४ ते ६ जुलै २०२५ रोजी पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे.
आम्ही पीवायसी हिंदू जिमखाना येथे विविध क्रीडाप्रकारांच्या लीग स्पर्धा आयोजित करीत असतो. सलग पाचव्या वर्षी सभासदांसाठी बुद्धिबळ लीग स्पर्धा आयोजित करताना आम्हांला आनंद होत आहे, असे पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दिपक गाडगीळ आणि सहसचिव सारंग लागू यांनी सांगितले.
क्लबचे सचिव सारंग लागू म्हणाले, की आम्ही सभासदांचे आरोग्य व मनोरंजनासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतो. चेस लीगमुळे सभासदांना एका व्यासपीठावर येण्यास, तसेच बुद्धिबळासारख्या खेळाच्या माध्यमातून परस्पर नातेसंबंध दृढ होण्यास साहाय्य होणार आहे. स्पर्धेला रिअल्टी सेव्हनचे कपिल त्रिमल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. रिअल्टी सेव्हनचे कपिल त्रिमल यांनी या स्पर्धेला दिलेल्या अतुलनीय पठिंब्याबद्दल त्यांचे आम्ही क्लबच्या वतीने आभार मानतो.
पुढे माहिती देताना चेस विभागाचे सचिव श्री आमोद प्रधान म्हणाले की, या लीगमध्ये सहा संघ भाग घेणार आहेत संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: १) गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स (मालक अनिल छाजेड, रोहन छाजेड व अनुज छाजेड), किंग्ज ६४ (मालक अमोल जोग व शुभदा जोग), आयकॉन वॉरियर्स (मालक अभिषेक ताम्हाणे), वाडेश्वर विझार्ड्स (स्वानंद व कौशिक भावे), ७ नाईट्स (मालक कपिल त्रिमल ) व गोल्डन किंग्ज (निरंजन गोडबोले).
लिलावात सर्वाधिक किंमत व पसंती मिळालेले खेळाडू असे आहेत- निरंजन गोडबोले (किंग्ज ६४, ३९००० पॉईंट्स), तन्मय चितळे (७नाईट्स, ३०००० पॉईट्स), मिहीर नानिवडेकर (गोल्डन ट्रायडेंट्स, ३०,००० पॉईट्स), किरण खरे(गोल्डन किंग्ज, ३०,०००पॉईंट्स). नंदन डोंगरे यांची स्पर्धा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या संयोजन समितीत आमोद प्रधान, नंदन डोंगरे, इंटरनॅशनल आरबीटर अथर्व गोडबोले यांचा समावेश आहे.

More Stories
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत सुमैर पवानी व क्रिश आनंद, आकाश ललवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता यांचा उपांत्य फेरीत प्रवेश