पुणे, ०३ जुलै २०२५: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली असून या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थी, पालक, विविध संघटनांपर्यंत व्हॉटस्ॲप ग्रुप, तत्सम इतर समाज माध्यमे आदी माध्यमातून पोहचवावी. तसेच महाविद्यालयांनी सूचना फलकांवरही प्रदर्शित करावी.
मागील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिताचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात असून हे अर्ज निकाली काढण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांस अर्ज फेरसादर करण्याबाबत महाविद्यालय स्तरावरुन कळविण्यात यावे. कोणतेही विद्यार्थी शिष्यवृतीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता सर्व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार