पुणे, ८ जुलै २०२५: कोथरूड अग्निशमन केंद्रातील जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी आपल्या सूट्टीच्या दिवशीही जबाबदारीचे भान ठेवत एक मोठी दुर्घटना टाळली. कात्रजमधील खोपडे नगर येथील एका इमारतीत, तिसऱ्या मजल्यावर खिडकीत अडकलेल्या एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव त्यांनी वेळीच धाव घेत वाचवला.
याविषयी माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की आज सकाळी सुमारे ९.०६ मिनिटांनी सोनवणे बिल्डिंगमधून उमेश सुतार या रहिवाशांचा आवाज ऐकून चव्हाण आपल्या गॅलरीतून बाहेर पाहिले असता, भाविका चांदणे (वय ४) ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून खाली पडण्याच्या अवस्थेत दिसून आली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता बिल्डिंगकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असता, घराला कुलूप होते आणि भाविका घरात एकटीच होती. तिची आई दुसऱ्या मुलीसोबत शाळेत गेली होती. योगेश चव्हाण यांनी तिची आई येताच दरवाजा उघडून तत्काळ बेडरूममध्ये धाव घेत भाविकाला खिडकीतून आत खेचले आणि तिचा जीव वाचवला.
“ही माझी ड्यूटी आहे, कोणाचेही प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे,” असे चव्हाण यांनी नम्रपणे सांगितले.

More Stories
निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ
पुणे ः अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त