October 27, 2025

Pune: अनधिकृत बांधकामावर कारवाई; सुमारे ४००० चौ.फुट जागा मोकळी

पुणे, १८ जुलै २०२५ : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील शाहू कॉलनी लेन नं. १, कर्वेनगर, गुलाबराव ताठे पथ, स्पेन्सर चौक, ममता स्वीट होम समोर, संजीवनी हॉस्पिटल शेजारी, महर्षी स्त्री शिक्षण संस्था, राजाराम पूल ते कर्वेनगर पानंद रस्ता या ठिकाणी रस्त्यावरील पदपथ, फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत कच्चे-पक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तपणे केली. उपआयुक्त अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे संदीप खलाटे व उपआयुक्त परिमंडळ क्र. ३ चे विजयकुमार थोरात यांच्या नियंत्रणाखाली, तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे दीपक राऊत यांच्या उपस्थितीत कारवाई पार पडली.

कारवाईदरम्यान कनिष्ठ अभियंता सागर शिंदे तसेच परिमंडळ क्र. ३ व ४ मधील कर्मचारी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रदीप महाले, दिनेश नवाळे, ज्ञानेश्वर बावधने, वैभव जाधव, किरण पाटील, हनुमंत काटकर, श्लोक तारू, विनोद दुधे व अतुल ब्राह्मणकार यांची उपस्थिती होती. यासोबतच ४ पोलीस, ६ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी व ४० बिगारी कर्मचारी उपस्थित होते.

या कारवाईत सुमारे ४००० चौ.फुट कच्चे-पक्के बांधकाम हटवण्यात आले. तसेच ३ हातगाड्या, २४ काऊंटर, २० इतर साहित्य, १ सिलेंडर, १७ शेड, १ व्यावसायिक वाहन यासह सुमारे ७ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकारची कारवाई पुढेही मोठ्या प्रमाणात सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.