पुणे, १८ जुलै २०२५ : पुणे शहराला खडकवासला, भामा आसखेड आणि रावेत बंधाऱ्यांमधून पाणी पुरवठा केला जातो. यापैकी मुख्य भर खडकवासला प्रकल्पावर असतो. गेल्या काही वर्षांपासून शहरातील पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, महापालिकेच्या ‘समान पाणी पुरवठा योजने’तून राबवलेल्या उपायांमुळे गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवरून थेट ३२ टक्क्यांवर आले आहे.
महापालिकेने आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यात गळतीचे प्रमाण ६.७३ टीएमसी इतके दर्शवले आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पावणेएक टीएमसीने कमी आहे. २०२४-२५ मध्ये गळतीचे प्रमाण ३५ टक्के म्हणजेच ७.५२ टीएमसी होते.
यंदा शहरासाठी एकूण २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली जाणार आहे, जी मागील वर्षीच्या २१.४८ टीएमसी मागणीपेक्षा ०.४५ टीएमसीने कमी आहे. सध्याच्या अंदाजानुसार पुण्याची लोकसंख्या ८१.६४ लाख असून, पुढील वर्षभरात ८४.६४ लाख लोकांसाठी पाणी पुरवठा करण्याचा अंदाज आहे.
पाण्याचा तपशीलवार खर्च (टीएमसीमध्ये):
नियमित वापर – ११.३४
टँकरने पुरवठा – ०.१९३
थेट जलवाहिनीद्वारे – १.२३
नवसमाविष्ट गावांसाठी – ०.९७५
तरंगती लोकसंख्या (३.८८ लाख) – ०.१७५
व्यावसायिक वापर – ०.३४२
पाण्याची गळती – ६.७५
एकूण मागणी – २१.०३ टीएमसी
मंजूर पाण्याचा कोटा:
मागील वर्षी १४.८२ टीएमसी पाणी कोटा पाटबंधारे विभागाकडून मंजूर करण्यात आला होता. यंदाही महापालिकेने अंदाजपत्रक तयार करून जुलै अखेरीस सादर करण्याची तयारी केली आहे. या वेळी किती पाणी मंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. – आयुक्त नवल किशोर राम यांच्या स्वाक्षरीनंतर अंदाजपत्रक सादर होणार
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार