पुणे | २२ जुलै २०२५: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) हवेली, खेड, मावळ आणि मुळशी तालुक्यांतील विविध गावांमधील ३५ भूखंडांचा ई-लिलाव ८० वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर करण्यात येणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या लिलावात ३२ सुविधा भूखंड, २ आरक्षित शैक्षणिक भूखंड, आणि १ सार्वजनिक सुविधा भूखंड (लायब्ररी / संगीत विद्यालय) यांचा समावेश आहे. भूखंडांची नोंदणी व निविदा दस्तऐवज डाऊनलोड करण्याची सुविधा २१ जुलै २०२५ सायंकाळी ५ वाजल्यापासून ११ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
ई-लिलावाची प्रक्रिया व तारीखा:
तांत्रिक पात्रतेची घोषणा: २१ ऑगस्ट २०२५
ई-लिलावाची सुरुवात: २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
संपूर्ण लिलाव प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती https://eauction.gov.in व www.pmrda.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहण्यास उपलब्ध आहे.
पात्र व्यक्ती व संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

More Stories
पुणे विमानतळातील बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडला
शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर
Pune: समाविष्ट २३ गावांत बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय