पुणे, २५ जुलै २०२५ः वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसमार्ग क्रमांक ३२८ चा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज सकाळी पार पडला. वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
या नव्या बससेवेअंतर्गत एकूण ४ स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई-बसेस दर तासाला एकाच्या वारंवारितेने धावणार असून, प्रवाशांना जलद, सुलभ आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या मार्गाचा मुख्य उद्देश वाघोलीसारख्या उपनगरी भागातील नागरिकांना थेट हिंजवडी आयटी पार्कशी जोडणे हा आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पुणे महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक संदीप सातव, शांताराम कटके, पंढरीनाथ कटके, पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्यासह इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसमार्ग क्र. ३२८ चे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे आहेत:
वाघोली – डायमंड वॉटर पार्क – लोहगाव – धानोरीगाव – विश्रांतवाडी – दिघी – भोसरी – शिवार चौक – मानकर चौक – इन्फोसिस फेज १ व २ – हिंजवडी माण फेज ३
या नवीन सेवेमुळे वाघोली परिसरातील हजारो नागरिकांना हिंजवडी आयटी हबपर्यंत थेट व किफायतशीर प्रवास करता येणार असून, पीएमपीएमएलकडून प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आल्याचे पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) यांनी माहिती दिली.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल