पुणे, ३० जुलै २०२५: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संभाव्य दौर्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्त करण्यात आलेले रस्ते पुन्हा काही दिवसांत खड्डेमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पर्वती विधानसभा प्रभाग क्रमांक ३७ च्या वतीने बिबवेवाडी – कात्रज भागातील शेळके वस्ती रिक्षा स्थानक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
प्रभागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, केवळ ‘व्हीआयपी’ दौर्यासाठी केलेली तात्पुरती डागडुजी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर प्रशासन व शासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध ‘खड्यात बोट’ टाकत आंदोलन झाले. येत्या १५ दिवसांत जर खराब रस्त्यांची योग्य दुरुस्ती केली नाही, तर पुणे महापालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
या आंदोलनात विश्वास गदादे, सागर आल्हाट, रविंद्र गायकवाड, श्याम गोरे, संदीप चौधरी, पी. बि. सावळे, जॉर्ज मदनकर, हरी वाघमारे, जिवन रोकडे, सतीश साबळे, अरुण इंगळे, परमेश्वर सनादे, कल्याण चौधरी, आकाश डबकरे, आनंद जाधव, संतोष पटेकर, प्रकाश उजागरे, बिपीन लोंढे, तौसीफ पठाण, बाबासाहेब कामनकर, जावेद शेख, गुंडप्पा अरेनकेरी, अजीज तांबोळी, शरणप्पा गायकवाड, विजय साळवे, महेश शिंगे, बंटी डोलारे, संदीप जाधव, शैलेन्द्र भिडे, पप्पू चव्हाण, सारिकाताई भोसले, सुनीताताई शिंदे, शोभाताई गायकवाड, ज्योतीताई तूपसौंदर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर